‘सेवा’ (SEWA - Self Employed Women`s Association) हे इलाबेन भट्ट यांचं अलौकिक जीवितकार्य आहे. लहान-सहान व्यवसायांवर उपजीविका करणार्या तळागाळातल्या लाखो गरीब स्त्रियांना संघटित करून ‘सेवा’नं त्यांना त्यांच्या कुवतीची, हक्कांची आणि संघटित झाल्यामुळे लाभलेल्या बळाची जाणीव करून दिली आणि त्यांना सक्षम बनवून त्यांची परिस्थिती सुधारली.