"स्त्रीला दैनंदिन जीवनात किती प्रकारच्या निरनिराळ्या मागण्या, पर्याय, निर्णय व कामांची सांगड घालायची असते... हे काम किती खडतर असतं ते मला माहीत आहे. आम्हा बायकांपैकी बर्याच जणी स्वत: घेतलेल्या निर्णयांबाबत विचारल्या जाणार्या, ओरखडे उठवणार्या प्रश्नांना तोंड देत व अपराधीपणाचं ओझं वागवत जगत असतात.