हिंदीत पुष्कळ लेखक व्यंगलेखन करतात. त्यांच्यातले सर्वोत्कृष्ट म्हणजे हरिशंकर परसाई होत, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. हरिशंकरजींच्या काही उत्कृष्ट व्यंगरचनाच्या मराठी अनुवादांचा हा संग्रह ही श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी मराठी वाचकांना दिलेली एक नावीन्यपूर्ण भेट आहे.