प्रचंड गर्दी आणि गजबजाटाच्या आयुष्याला कंटाळलेली वकील जोसलीन कोल शांतता आणि एकान्त शोधण्यासाठी वॉशिंग्टन राज्यात स्थायिक होते... एक नवा व्यवसाय उभारण्याच्या कामात मदत करायला वकील शोधत डीन बेल्डन जोसलीनच्या ऑफिसमध्ये येतो. काही दिवसांत डीनला ग्रँड ज्यूरींसमोर साक्षीसाठी उभे राहावे लागते; पण अचानक त्याचा मृत्यू होतो.
पॉल माद्रियानी यांच्याकडे जोना हेल आपली निर्वाणीची समस्या घेऊन आला, तेव्हाच पॉलच्या लक्षात आलं, की सॅन डियागोमध्ये शांतपणे आयुष्य घालवायचं आपलं स्वप्न आता दूर ठेवावं लागणार आहे.
तीन वेगवेगळ्या कालखंडात घडलेली एक विलक्षण रोमांचक,उत्कंठापूर्ण रहस्यकथा