Mrunalini Gadkari
स्वामी विवेकानंदांचे नाव आणि ढोबळमानाने त्यांचे चरित्र आपल्याला माहीत असते; पण संन्यास घेतल्यानंतरही स्वामीजींनी संवेदनशीलता जपली होती, जन्मदात्या आईसाठी कौटुंबिक भाऊबंदकीत लक्ष घालणे त्यांना भाग पडले होते, अगदी कोर्टकचे-याही कराव्या लागल्या होत्या... हा असा तपशील मात्र आपल्याला ठाऊक नसतो. त्यांच्या चरित्रातील अशा अज्ञात पैलूंवर प्रकाशझोत टाकणारे हे पुस्तक.
देवदास’ शरदबाबूंच्या लेखणीतून साकारलेली एक अजरामर प्रेमकहाणी.
कंठात वैखरी, हृद्यात मध्यमा, स्वाधिष्ठानात पश्यंती. त्यापुढे गभीरात गेल्यावर ती वाणी माणसाला ऎकू येत नाही. ती मग होते परा.
एका बंगाली स्त्रीची करुण कहाणी.
रवीन्द्रनाथ टागोर हे कथाकार म्हणून आपल्याला फारसे परिचित नाहीत परंतु त्यांनी लिहिलेल्या कथा ह्या बंगालीच नव्हे तर भारतीय साहित्यातील अनमोल ठेवा आहे.
आयरिश महिलेच्या भारतावरील निष्ठेची कहाणी क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता
लोक ज्या स्त्रीला `नष्ट` म्हणतात, तीच खरी निकोप आणि बुद्धिमान माणूस असते. तसलिमा नासरिन
स्वत:च्या शरीरावर झालेल्या अत्याचारांच्या कथा तिच्याइतक्या समर्पक शब्दांत, कलात्मक भाषेत कोणीही मांडलेल्या नाहीत, हेच तर आहे तिचे वेगळेपण.
संपूर्ण स्त्रीजीवनात – पुरुषांची लालसा, नीचपणा, हिंस्रपणा, अधिकार गाजविण्याची कृती, लबाडी आणि प्रत्येक गोष्टीत दखल देण्याची सवय कशी दिसून येते, ह्याविषयीची आपली मते लेखिकेने अगदी धीटपणे मांडली आहेत.
या अखंड देशातच कल्याणीचा जन्म झाला होता. भारतानं ब्रिटिशांना हाकललं, पण स्वत:चे तुकडे करून हाकललं ...
तीन सांगातिणी’ या कथासंग्रहातील तीन कथा या रवीन्द्रनाथ टागोरांनी १९३८-१९४० या काळात लिहिल्या. रवीन्द्रनाथांचा १८६१-१९४१ हा जीवनकाल पाहता; या कथा त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या अखेरीला लिहिल्या. त्या तीनही दीर्घकथा त्यांच्या आधीच्या कथांच्या तुलनेत व्याqक्तरेखा आणि तंत्र या बाबतीत सर्वस्वी वेगळ्या आहेत.