प्रत्येक देशाच्या इतिहासात त्या देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारे प्रसंग घडून येतात;आणि त्या प्रसंगाना अनुरूप आशी पुस्तकेही त्या देशाच्या वाडमयात आढळून येतात.गॉर्कीची आई हि कादंबरी ,आम्हां रशियनांच्या दॄष्टीने अशा प्रकारात मोडते.
आई' ही कादंबरी मॅक्झिम गोर्की यांनी १९०७ साली लिहिली. या पुस्तकाला लाखो वाचक लाभले. जागतिक साहित्यामध्ये इतकी परिणामकारक कादंबरी दुसरी कोणतीही नसेल.