गुलबर्ग्याच्या तुरुंगात कारावासात असताना लिहिलेली नानासाहेब गोर्यांची ही डायरी म्हणजे कैदखान्याच्या दगडविटांच्या चार निर्जीव भिंती ओलांडून जाणारा एक मुक्त चिंतनाचा अविस्मरणीय प्रवाहच आहे
नानासाहेब गोरे यांचं बालपण देवगडमधे गेलं. तेथे पुळणीवर खेळताना उमटलेली पावले समुद्राच्या लाटा जशा डोळ्यांदेखत पुसून टाकत त्याप्रमाणे काळाच्या लाटांनी त्यांच्या खेळगड्यांच्या आणि कुटुंबियांचा स्मृती पुसून टाकल्या.