प्रत्येकाच्या आयुष्यात जी महत्त्वाची माणसे येतात ती पूर्वसंचितने भेटतात असे म्हणतात. मागच्या जन्मात आपले त्यांच्याबरोबर काय संबंध होते हे आठवणे अशक्य आहे पण या जन्मात भेटल्यावर मात्र ती माणसे आपल्य स्मृतीपटलावर त्यांच्या ज्या खूणा ठेवून जातात, त्या मिटवता येत नाहीत. संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तिचे आपल्या मनावर ठसे उमटले असतात. काही खोल, काही पुसटसे,...