कुमार केतकर सव्यसाची संपादक आहेत त्यांचे विचारवर्तुळ पत्रकारितेच्या परिघापलीकडे पसरलेले आहे
ज्वालामुखीच्या तोंडावर : इंदिरा गांधींची हत्या होऊन 33 वर्षे झाली तरी त्यांची प्रतिमा आणि प्रभाव कमी झालेला नाही. त्यांना इतिहासातून पुसुन टाकण्याचा प्रयत्न जोरात चालू आहे. परंतु त्यांच्या असामान्य कर्तृत्वाच्या आणि त्यागाच्या खुणा व स्मृती सर्वत्र, लोकमानसात कोरल्या गेल्या आहेत.
भूतकाळाच्या धूसरतेतून ते वाचकाला वर्तमानाकडे घेऊन जातात, तेव्हा आजच्या व्यामिश्र जीवनाची गुंतागंत शक्य तितकी स्पष्ट दाखवण्याचा त्यांचा सायास असतो.