वासनेच्या बाबतीतला माणसाचा गोंधळ आजचा काळ आधुनिक होऊनही संपत नाही. त्या चांगल्या-वाईट गोष्टी गोंधळाच्याच होतात. या कथासंग्रहाच्या रूपानं राजन खान यांनी वासनांचा घेतलेला वेध हा माणूसजात कळणं अधिक सोपं करणारा आहे.
माणूस माणसासारखं नैतिक जगला तरी खूप झालं...
पातिव्रत्य आणि प्रेम या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात का?या मुद्द्याचाच वेध घेणारी कादंबरी.
तीच माणसं, तीच नाती आणि त्याच रीतीभाती. नुसती बघण्याची दॄष्टी बदलली की कसं वेगळंच दिसतं सगळ - राजन खान.
माणस जगताना आपल मन मेंदू शरीर जगण्याचे व्यवहार यांचे दोन कप्पे पाडूनच जगतो त्यातल्या एका कप्प्याला तो आपला कप्पा म्हणतो, एकाला बाहेरचा कप्पा.
भूमीच्या तुकड्याला आपण देश म्हणतो. भूमीच्या एखाद्या तुकडयावर समूहानं हजारो वर्ष जेव्हा लोक राहतात. तेव्हा त्यांच्या जगण्यावागण्याची एक संस्कृती तयार होत जाते.
जगभरातल्या अनेक क्षेत्रांमध्ये राबणार्या आपल आयुष्य घालवणार्या अनेक माणसांच्या गोष्टी आपण वाचतो जगात महत्वाच्या असणार्या मराठी नावाच्या एका भाषेतल्या प्रांतातल्या त्याच भाषेच्या साहित्यक्षेत्रात आपल संपूर्ण आयुष्य घालवणार्या एका लेखकावरची गोष्ट एक लेखक खर्च झाला
माणसांच्या प्रदेशातल्या काही व्यवधानांचा तळगाळ शोधणार्या या कथा आहेत एकूण माणसांचा प्रदेश
या पुस्तकात माणसाच प्रेम वय विश्वास लैंगिकता कुटुंब समाज संस्कार आणि त्या सगळ्यांच्या एकमेकांतल्या नात्यांवर भाषा झाली आहे
पण हे तर खरंच आहे की, आज जगात प्रत्येक माणूस असवस्थ आहे. आपण माणूस आहोत म्हणजे काय आहोत हे समजून घ्यावं लागेल.