आनंदी आणि उत्साही आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचारांच्या मनाची बैठक खूप महत्वाची असते. या पुस्तकातील कोणतेही पान उघडून वाचलेला विचार आपले जीवन आशावादी, उत्साही आणि आनंददायी करेल.
योगायोग घडू देण्यासाठी मनाच्या खिडक्या उघड्या ठेवायला हव्यात. कुठला तरी दूर देशीचा पक्षी येऊन अलगद बसणार असेल तुमच्या खांद्यावर... कुणी सांगावं पुढे जाऊन तो पक्षीच ओळख होईल तुमची...