या स्मृतिग्रंथातून संपूर्ण शिवचरित्र सादर करण्याचा अथवा शिवचरित्राच्या प्रत्येक पैलूवर लेख देण्याचा आमचा उद्देश नसून शिवछत्रपतींच्या युगकार्याचे थोर इतिहासकारांनी विविध दृष्टिकोनांतून केलेले मूल्यमापन किंवा चिकित्सा वाचकांसमोर संक्षेपाने ठेवणे, हा आमचा प्रधान हेतू आहे.