या काव्यसंग्रहातील कविता सौमित्रने मराठी काव्याची परंपरा पूर्णपणे झुगारून देऊन, स्वत:च्या स्वतंत्र अभिव्यक्तीतून घडवलेल्या कविता आहेत.
आपल्या भयाण एकाकीपणाचे संदर्भ लागू देऊ नयेत वाचून दाखवू नये कुठलीही कविता, नविन कविता लिहिल्यावर कवींनी सांत्वनाला भेटावं समजूतदारपणे घ्यावा आधार एकमेकांचा, सरपटतांना आत कवितेचा साप भिनू द्यावं विष स्वत:तही पण कुणाला डंख मारु नये, कुठेतरी कधीतरी कविता छापून आल्यावरच कळावं सार्यांना कवीमध्ये तेव्हाच काही मरुन गेल्याचं, आठवणी प्रसंग व्यक्तींचे मृत्यू...