जाहिरात म्हणजे काय? ती कशी करावी? ती कोणत्या पद्धतीने केली म्हणजे तिचे प्रभावी परिणाम दिसतात आणि ग्राहकाचे हित नेमके कशात असते या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देणारे जाहिरातविश्व हे पुस्तक म्हणजे या क्षेत्रातील प्रत्येकसाठी पथदर्शक असणारे अक्षरधन आहे. ज्याला जाहिरात क्षेत्रात करियर आणि व्यवसायक्षेत्रात वर्धमान होण्याची इच्छा आहे, त्या प्रत्येकाने वाचायाला...
राष्ट्रीय अस्मिता, राष्ट्रभक्ती यांचे अपूर्व दर्शन प्रथमत: घडले ते 1857 च्या स्वातंत्र्यसमरात. भूमातेच्या परदास्यमुक्तीकरिता भारतीय जनतेने ब्रिटीशांविरुद्ध एकत्रितपणे दिलेला हा पहिला लढा. या लढ्यातच बीज पेरले गेले ते स्वातंत्र्याच्या उष:कालाचे. प्राणांची आहुती देऊन लढलेल्या वीरांचा हा कादंबरीमय इतिहास. सळसळणार्या रक्ताचे, उत्स्फूर्त एकोप्याचे, अपार...
दु:ख, अवहेलना, अपमान, राग आणि समाजाचे चाकोरीबद्ध नियम यांच्या धगीत होरपळून गेलेल्या ऎका नात्याची हृदयस्पर्शी कथा!
राजा हाल शालिवाहनाच्या गाथा सप्तशती या काव्यग्रंथातील कवितांचे रत्नाकर पटवर्धन यांनी केलेले सुलभ मराठीकरण. दोन दोन ओळींच्या चटचपटीत कविता किंवा गाथांचा, खर्या अर्थाने सनातन असणारा, म्हणजेच शाश्वत तरी नित्यनवा, सदा ताजा आणि टवटवीत असणारा, बोचरा तरी गुदगुल्या करणारा, अस्सल भारतीय तत्त्वज्ञान सांगणारा हा काव्य संग्रह.