रघुवीर कुल यांनी प्रस्तुत पुस्तकात खलनायकाची तात्विक चर्चा केलेली नाही, तरीही पडदयावरचे खलनायक म्हणून प्रसिध्दी पावलेल्या, आपल्या तिरस्कारकर्त्यांचा म्हणजे पर्यायाने चाहत्यांचा एक मोठा वर्ग निर्माण करणा-या कलावंतांविषयी आणि त्यांनी साकारलेल्या खल व्यक्तिरेखांविषयी वाचकाशी गप्पा मारलेल्या आहेत.