पावसाच्या रिमझिम सरी, हिरवागार निसर्ग, विविध सण, या सर्वांमुळे श्रावणातील वातावरण प्रसन्नता व मांगल्य यांनी भारलेले असते. या अशा दुर्मिळ वातावरणाला जोश आणि ठासून भरलेल्या उत्साहाची जोड मिळते ती, मंगळागौरीच्या खेळांमुळे !
नेहमीच लागणारेआणि प्रत्येक घरात असायला हवेत असे हे पदार्थ
पैशाची बचत, नाविन्य, विविधता, लज्जत आणि घरगुतीपणा सर्व काही साधणारे असे हे पुस्तक प्रत्येक घराच्या संग्रहात असावे.
ह्या पुस्तकामध्ये सर्वांच्याच पसंतीला उतरणारा बटाटा लेखिकेने खुपच अभ्यासुन लिहिला आहे.
नवरात्रामध्ये रोज भोंडला होतो. हस्तनक्षत्र असल्याने पाटावर हत्तीचे चित्र काढतात. 10 - 15 मुली एकत्र येतात. हातात हात धरून पाटाभोवती फेर धरतात.
कॅटरिंग कॉलेजचे विविध कोर्सेस, घरच्या घरी पाककृती क्लासेस घेणे, अनेक पाककला स्पर्धेत भाग व बक्षिसे. आता पाककला स्पर्धांत परीक्षकाची भूमिका. या सर्वांमुळे लेखिका सौ. वैजयंती केळकर यांचे पाककलेतील नैपुण्य लक्षात येते.
पावाच्या विविध पाककृती पावाची रंगत वाढविणारे नव्या पिढीसाठी हे एक परिपूर्ण पुस्तक होय
ह्या पुस्तकात नव्वद खिरी तसेच सोपे-कठीण असे इतर गोड पदार्थ दिले आहेत.
अंबावडीपासून म्हैसूरपाकापर्यंत गोड वडयांचे अनेकानेक प्रकार बाकरवडीपासून सुरळीच्या वडीपर्यंत तिखट वडयांचे विविध प्रकार आणि बुंदीच्या लाडूपासून डिंकाच्या लाडूपर्यंत लाडवांचे भरपर प्रकार, पाककलेत निपूण असलेल्या सौ. वैजयंती केळकर यांनी या पुस्तकात अगदी सोप्या भाषेत सांगितले आहेत.