छ शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्मितीसाठी अनेक मातब्बरांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भक्तीशिवाय अनेक विषयांवर अभंग लिहिले हे आतातरी आपण लक्षात घेऊया.
कादंबरी ल्रेखनातील स्त्रीचे चित्रण, स्त्रीचे दर्शन अधिक अर्थपुर्ण व अभ्यासनीय आहे.
विज्ञानाच्या आणि संशोधनाच्या माध्यमातून माणसाचे जीवन बदलू शकते हे त्रिकालादित शक्य आहे
वेदोक्त मंत्र म्हणजे साबण आणि पुराणोक्त मंत्र म्हणजे अंग घासण्याचा दगड असे काही नाही. क्षत्रिय, वैश्य, शूद्र ब्राह्मणाला उच्च मानतात, म्हणून तो उच्च ठरतो.
झलकारी कडाडली... ‘असे गद्दार, बेईमान, नमकहराम... सोन्याच्या मोहरांच्या बदल्यात तू तुझा प्रामाणिकपणा विकलास, तू एक ठाकूर असूनही राणीचा विश्वासघात केला आहेस.