वसुली व्यवस्थापन या विभागास अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. किंबहुना कर्ज व वसुली व्यवस्थापन हे दोन्ही विभाग एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
ज्या आपल्या देशाची संस्कृती इतक्या परमोच्च बिंदूपर्यंत पोहचली होती व ज्या देशाच्या शास्त्राबद्दल परदेशी विद्वानांच्या ठायी एवढा आदर होता, त्या देशातील आजच्या नागरिकांना आपण करीत असलेल्या व्यवसायाबद्दलची भारतीय पार्श्वभूमी विचारली तर जवळजवळ सर्वांच्या माना अज्ञानामुळे खाली झुकतील.
या पुस्तकातील लिखाण हे लेखकाला जे बॅंकिग समजले आहे, जी कामे लेखकाने केली आहेत त्यावर केलेले हे मुक्तचिंतन आहे.