कॅ.बेलवलकर लिखित पेशवाईच्या काळावरील ४ कादंबऱ्यांचा संच.
श्री. बेन्द्रे यांनी “छत्रपती संभाजी महाराज" हे चरित्र लिहून ऎतिहासिक चरित्रलेखनाचा एक उच्चतर मानदंडच निर्माण केला आहे. या पुस्तकाच्या अखेरची संदर्भगंथसूची त्यांच्या अध्ययनाच्या व व्यासंगाच्या विस्ताराची सूचक आहे व या ग्रंथातील प्रकरणवारी इतिहासाच्या अंगोपांगांचा केवढा व्याप लक्षात घ्यावा लागतो याची दर्शक आहे.
वा. सी. बेंद्रे लिखित ‘छत्रपती शिवाजी महाराज’ पुर्वार्ध आणि उत्तरार्ध उपलब्ध.
भारतीय इतिहासातील १७व्या व १८व्या शतकात मराठ्यांचे योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. फ्रेंचांबरोबर निर्माण झालेल्या त्यांच्या संबंधांमुळे इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीला अनेक धोरणे बदलावी लागली. १८व्या शतकामध्ये मराठा राज्याचे मराठा मंडळामध्ये रुपांतर झाले.
महाराज तक्तारवार विराजमान होताच बाजीराव एक पाऊल मागे सरले, त्यांनी परत आदब ठेवून महाराजांना त्रिवार मुजरा केला. ते मातोश्रींच्या बैठकीजवळ गेले अन त्यांना मुजरा करुन ते महाराजांच्या उजव्या हाताअला असलेल्या पेशवाईच्या बैठकीवर विराजमान झाले.
पेशवाईचा माध्यान्हकाळ म्हणजे नानासाहेबांची कारकीर्द ! तिचा यशस्वी पूर्वार्ध कॅ. बेलवलकरांची ही कादंबरी प्रस्फूर्त होण्यास कारणीभूत झाला !
श्रीमंत रघुनाथरावांची तेग, त्यांना घेरणार्या गनिमावर विजेसारखी कोसळत होती. अटकेच्या किल्याचा परिसर तोफांमधून उडलेल्या दारुगोळ्यांच्या वर्षावाने काळवंडून गेला होता आणि त्यातच पांढर्याशुभ्र घोड्यावरील मार्तंड केशरी पेहराव ल्यालेली आणि हाणा... मारा... अशा आरोळ्या देत गनिमावर तुटून पडणारी दादासाहेबांची विकराल पराक्रमी मूर्ती पाहुन अर्धमेला झालेला मराठी...
25/30 वर्षातल्या घटनासंबंधाने मराठी, इंग्रजी, फ्रेंच, हिंदुस्थानी वगैरे भाषांत इतके विपुल साहित्य, म्हणजे जुने ऎतिहासिक साहित्य उपलब्ध झाले आहे की, अभ्यास करणारा गोंधळून जातो. तेव्हा सामान्य वाचकाला रमवावे आणि कादंबरीच्या वाटेने त्याला सुखवीत न्यावे अशी कल्पना कोणा रसिकाच्या मनात उद्भवली असेल तर ते उचितच म्हणावे लागेल.
रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी लिहिलेलं श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचं हे चरित्र. वास्तविक रियासरकारांनी मराठी रियासतीच्या सुरवातीच्या भागात नानासाहेबांचे राज्य कारभार आणि पानिपत प्रकरण असे दोन भाग केले होते. पण ते संबंध घडमोडीसंबंधी असल्याने असदेसाईंनी नानासाहेबांच्याविषयीची मते परस्पराविरुध्द होती.