अकल्पित दु:खंना सामोरे गेल्यानंतरही आम्ही तणावमुक्त कसे रहावे. आम्ही हे जग बदलू शकतो का? जीवनातील त्रुटी, विसंगती पहाता त्यांच्याशी ताळमेळ तरी कसा साधावा?
हे मना रिलॅक्स प्लीज या पुस्तकात व्यक्तीच्या सर्वसाधारण गरजांचा समावेश आहे.
आजवरच्या अनेक ग्रथांनी अनेकांच्या जीवनाला नवनवीन दिशा व दृष्टी लाभली. ’ज्यावेळी तुमचा एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरा उघडत असतो’, याचीही ते आपल्याला प्रकर्षाने जाणीव करुन देतात. आयुष्य सर्व दिशांनी खुले-स्वच्छ-मोकळे असावे आणि या खुल्या मनानेच प्रत्येकाने जीवनाला, प्रत्येक क्षणाला सामोरे जावे असे त्यांना वाटते.