गेम्समध्ये रमणारी मुले गुंतली गोष्टींत - Rajiv Tambe | Akshardhara | Bal-Kumar Shabdotsav

Posted By: Akshardhara Books In: Home On: Monday, April 24, 2017 Comment: 0 Hit: 2881

"खेळा- नाचा- वाचा' हा खास बालवाचकांसाठी उपक्रम आयोजित केला आहे. या अंतर्गत बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधला.

पुणे - हल्लीची मुले स्मार्ट फोन हातात आल्याशिवाय गप्प बसत नाहीत. ती स्मार्ट फोनवरील गेम्समध्ये किंवा "फेसबुक'वर रमलेली पाहायला मिळतात; पण गेम्स, फेसबुक बाजूला ठेवून मुले आज रमली ती चक्क कविता आणि गोष्टींमध्ये. कधी विचार करायला लावणाऱ्या; तर कधी खळखळून हसायला लावणाऱ्या गोष्टींमुळे मुलांचे चेहरे आनंदाने फुलून गेले. 

पुस्तक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर "अक्षरधारा'तर्फे "खेळा- नाचा- वाचा' हा खास बालवाचकांसाठी उपक्रम आयोजित केला आहे. या अंतर्गत बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी मुलांशी मनमोकळा संवाद साधला. "अक्षरधारा'च्या रसिका राठीवडेकर उपस्थित होत्या. 

"भीमाचे जेवण', "दगड आणि परी' अशा मजेशीर कविता तांबे यांनी मुलांसमोर सादर केल्या. त्यानंतर प्राण्यांचे वर्णन करणाऱ्या कथा सांगत त्यांनी मुलांना प्राण्यांची नावे विचारली. क्षणाचाही विलंब न लावता, कधी- कधी तर कथा पूर्ण होण्याआधीच मुले उत्तरे सांगू लागली. त्यामुळे गप्पांची मैफल रंगत गेली. कप, बशी, चमचा आणि गादी, उशी, पांघरून यांची कथेतून व्यक्त झालेली व्यथाही तितकीच रंगतदार ठरली. 

Comments

Leave your comment